नवी दिल्ली – भाजप आणि एनडीए आघाडीचा विजयरथ ज्या राज्यांमधून निघाला होता त्याच राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात भाजपच्या विजयरथाला ब्रेक लागला आहे. एनडीएमधूनही एक-एक सहकारी पक्ष सोडून जात आहे, शिवसेनाही खूष नाही. यासर्व परिस्थितीचे आता भाजपला आत्मचिंतन करणे गरजचे असल्याचे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपच्या २०१४ लोकसभेच्या ऐतिहासिक
विजयाआधी त्यांनी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणूक जिंकली
होती. येथून भाजपच्या विजयरथाला सुरुवात झाली होती, याच राज्यांमध्ये आता २०१९च्या
लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या विजयाला पूर्णविराम मिळाला आहे. जनतेने भाजप
सरकारवरील आपला रोष व्यक्त केला आहे, असे सांगत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांनी
आता फक्त चिंतन नाही तर आत्मचिंतन करण्याची गरच असल्याचे म्हटले आहे.
राऊत म्हणाले, गेल्या
चार-साडेचार वर्षांमध्ये एनडीएचे अनेक घटकपक्ष भाजपवर नाराज आहेत. काहींनी एनडीएला
सोडले देखील आहे. शिवसेनाही खूष नसल्याचे राऊत म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणूक
निकालानंतर भाजप नेत्यांनी आता आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत
मिळालेल्या पाशवी बहुमताने भाजप नेत्यांमध्ये एक प्रकारची गुर्मी आल्याचे शिवसेना
वारंवार म्हणत आली आहे. एनडीएमधील सहकारी पक्षांना मिळणारी दुय्यम वागणूकीचा
मुद्दा शिवसेनेने कायम उपस्थित केला आहे. मात्र त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष्य करुन
भाजप त्यांना टाळत आली आहे. याचाही शिवसेना नेत्यांमध्ये रोष आहे.